Event Detail
Armed Forces Medical College, पुणे, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार तसेच जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांचे संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील संपूर्ण 20 लक्ष जनतेची सिकल सेल चाचणी करण्यात येणार आहे.

Armed Forces Medical College, पुणे, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार तसेच जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांचे संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील संपूर्ण 20 लक्ष जनतेची सिकल सेल चाचणी करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाचे पुढाकाराने साकारलेल्या या संशोधन प्रकल्पात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय विद्यार्थी आणि जिल्हा परिचारिका प्रशिक्षण केंद्र येथील नर्सिंग विभागाच्या विद्यार्थिनी यांचे मार्फत नंदुरबार जिल्ह्यातील लोकांचे रक्ताचे नमुने तथा संबंधित वैयक्तिक माहिती (Data )गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ह्या प्रकल्पाद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील सिकल सेल आजाराची व्याप्ती मोजणे शक्य होणार आहे. तसेच ह्या आजाराची Repository तयार केली जाणार आहे. ज्यामुळे ह्या आजाराच्या निदान, उपचार आणि प्रतिबंधासाठी नियोजन करण्यास मदत होणार आहे. रक्त नमुन्यांची जलद गतीने तपासणी करणेसाठी फ्रान्स देशातून २.५ कोटी रुपयांचे अत्याधुनिक उपकरण आयात केलेले आहे. ह्यात दिवसाला कमाल ७००० नमुने capillary electrophoresis या प्रक्रिये द्वारे चाचणी केली जाणार आहे. पुणे येथिल तज्ञ डॉक्टरांची चमू रक्त तपासणी करत आहे. सदर प्रकल्पामुळे नंदूरबार सारख्या आदिवासीबहुल, अतिदुर्गम डोंगराळ भागात वैद्यकिय संशोधनाला चालना मिळणार असून वैद्यकीय विद्यार्थ्यांना समाजात / गावागावात जाऊन आरोग्याचे विविध पैलूंचे शिक्षण घेणे शक्य होणार आहे.