शासकीय वैदयकीय महाविद्यालय नंदुरबार येथील बालरोगशास्त्र विभाग येथे DNB PAEDIATRICS साठी NBE, NEW DELHI यांचे कडून नुकतेच निरीक्षण करण्यात आले आहे. सदर निरीक्षण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अरुण हुमणे यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.
Read more...आज दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नंदुरबार येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये एकूण 48 ब्लड बॅग संकलित करण्यात आल्या. शिबिराचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार चे अधिष्ठाता डॉ अरुण हुमणे यांनी केले. सदर शिबिराचे आयोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथील रक्तपेढी मार्फत करण्यात आले होते.
Read more...Armed Forces Medical College, पुणे, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार तसेच जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांचे संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील संपूर्ण 20 लक्ष जनतेची सिकल सेल चाचणी करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाचे पुढाकाराने साकारलेल्या या संशोधन प्रकल्पात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय विद्यार्थी आणि जिल्हा परिचारिका प्रशिक्षण केंद्र येथील नर्सिंग विभागाच्या विद्यार्थिनी यांचे मार्फत नंदुरबार जिल्ह्यातील लोकांचे रक्ताचे नमुने तथा संबंधित वैयक्तिक माहिती (Data )गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ह्या प्रकल्पाद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील सिकल सेल आजाराची व्याप्ती मोजणे शक्य होणार आहे. तसेच ह्या आजाराची Repository तयार केली जाणार आहे. ज्यामुळे ह्या आजाराच्या निदान, उपचार आणि प्रतिबंधासाठी नियोजन करण्यास मदत होणार आहे. रक्त नमुन्यांची जलद गतीने तपासणी करणेसाठी फ्रान्स देशातून २.५ कोटी रुपयांचे अत्याधुनिक उपकरण आयात केलेले आहे. ह्यात दिवसाला कमाल ७००० नमुने capillary electrophoresis या प्रक्रिये द्वारे चाचणी केली जाणार आहे. पुणे येथिल तज्ञ डॉक्टरांची चमू रक्त तपासणी करत आहे. सदर प्रकल्पामुळे नंदूरबार सारख्या आदिवासीबहुल, अतिदुर्गम डोंगराळ भागात वैद्यकिय संशोधनाला चालना मिळणार असून वैद्यकीय विद्यार्थ्यांना समाजात / गावागावात जाऊन आरोग्याचे विविध पैलूंचे शिक्षण घेणे शक्य होणार आहे.
Read more...आज दिनांक 1 डिसेंबर २०२३ रोजी जागतिक एडस् दिनाच्या निमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार, जिल्हा सामान्य रुग्णालय नंदुरबार, नंदुरबार जिल्ह्यातील विविध नर्सिंग तसेच ईतर महाविद्यालयांचे विद्यार्थी, तसेच एडस् जनजागृती मध्ये कार्यरत विविध संस्था यांचे संयुक्त विद्यमाने जनजागृतीसाठी भव्य रॅली चे आयोजन DAPCU मार्फत करण्यात आले होते. त्यात विविध महाविद्यालय, विद्यालये यांचे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सदर रॅली नंदुरबार शहरात काढण्यात आली. रॅली ची सुरुवात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार चे अधिष्ठाता डॉ अरुण हुमणे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नरेश पाडवी यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथील डॉ अमोल किनगे, डॉ सतिश वड्डे, डॉ संतोष पवार, डॉ सुधाकर बंटेवाड, करण जैन आणि विविध विभागांचे अध्यापक व कर्मचारी सदर रॅली साठी उपस्थित होते. रॅली ला अधिष्ठाता डॉ अरुण हुमणे यांनी "सामाजिक पुढाकार - एडस् चा संहार" या थीम वर संबोधित केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Read more...शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथील आयुष इमारत येथे स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा महाविद्यालयाचे मा अधिष्ठाता डॉ अरुण हुमणे यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमास अध्यापक वर्ग, कर्मचारी, तसेच वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते
Read more...शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार तर्फे राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त 3 ऑगस्ट रोजी जनजागृती रॅली चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर रॅली धुळे चौफुली नंदुरबार पासून अंधारे चौक नंदुरबार इथपर्यंत काढण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन आणि रॅली च्या समारोपाच्या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वैद्यकीय महाविद्यालाचे अधिष्ठाता डॉ अरुण हुमणे यांनी केले, तसेच अधिकाधिक जनतेनी ह्या संकल्पनेबाबत जाणून घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथपाल श्री शेळके यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे विविध विषयांतील वरिष्ठ प्राध्यापक, अध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
Read more...शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार तर्फे राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त 3 ऑगस्ट रोजी जिजामाता महाविद्यालय नंदुरबार येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वैद्यकीय महाविद्यालाचे अधिष्ठाता डॉ अरुण हुमणे यांनी केले, तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांनी ह्या संकल्पनेबाबत जाणून घेण्याचे आवाहन केले. डॉ अमोल किनगे, सहायक प्राध्यापक, जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग यांनी जनजागृतीसाठी प्रेझेंटेशन सादर केले. कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन श्री करण जैन यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, अध्यापक तसेच एनएसएस विभागाचे सहकार्य लाभले.
Read more...शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार तर्फे मनुदेवी फाउंडेशन नंदुरबार संचालित मूकबधिर विद्यालय नंदुरबार येथे स्वस्थ मुख अभियान राबविण्यात आले. त्या प्रसंगी दंतशल्यचिकित्सा विभागाच्या डॉ भावना वळवी आणि चमू द्वारे मूकबधिर विद्यार्थ्यांचे दातांची तपासणी करण्यात आली आणि स्वच्छ मुख ठेवण्याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन आणि मूकबधिर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार डॉ अरुण हुमणे सर यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक, अध्यापक आणि कर्मचारी यांचे सहकार्याने सदर तपासणी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
Read more...शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार च्यावतीने ३० जुन रोजी शासकीय रुग्णालय येथे विकृतीशास्त्र विभागातर्फे जागतिक रक्तदाता दिनाच्या औचीत्याने रांगोळी स्पर्धा व पथनाट्य आयोजित करण्यात आले होते. वैद्यकीय विद्यार्थी तसेच वैद्यकीय समाजसेवक यांनी रांगोळी आणि पथनाट्य द्वारे समाजप्रबोधन केले. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अरुण हुमणे यांनी रुग्णांना / नातेवाईकांना मार्गदर्शन केले व रक्तदानाबद्दल योग्य माहिती जाणून घेऊन किमान आपल्या किंवा प्रिय व्यक्तीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तरी रक्तदान करावे असे आवाहन केले. विकृतिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ संतोष पवार, ग्रंथपाल श्री किशोर शेळके यांच्या देखरेखीखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Read more...