Event Detail
01 Jul 2023
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार च्यावतीने ३० जुन रोजी शासकीय रुग्णालय येथे विकृतीशास्त्र विभागातर्फे जागतिक रक्तदाता दिनाच्या औचीत्याने रांगोळी स्पर्धा व पथनाट्य आयोजित करण्यात आले

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार च्यावतीने ३० जुन रोजी शासकीय रुग्णालय येथे विकृतीशास्त्र विभागातर्फे जागतिक रक्तदाता दिनाच्या औचीत्याने रांगोळी स्पर्धा व पथनाट्य आयोजित करण्यात आले होते. वैद्यकीय विद्यार्थी तसेच वैद्यकीय समाजसेवक यांनी रांगोळी आणि पथनाट्य द्वारे समाजप्रबोधन केले. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अरुण हुमणे यांनी रुग्णांना / नातेवाईकांना मार्गदर्शन केले व रक्तदानाबद्दल योग्य माहिती जाणून घेऊन किमान आपल्या किंवा प्रिय व्यक्तीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तरी रक्तदान करावे असे आवाहन केले. विकृतिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ संतोष पवार, ग्रंथपाल श्री किशोर शेळके यांच्या देखरेखीखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.