शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार तर्फे राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त 3 ऑगस्ट रोजी जनजागृती रॅली चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर रॅली धुळे चौफुली नंदुरबार पासून अंधारे चौक नंदुरबार इथपर्यंत काढण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन आणि रॅली च्या समारोपाच्या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वैद्यकीय महाविद्यालाचे अधिष्ठाता डॉ अरुण हुमणे यांनी केले, तसेच अधिकाधिक जनतेनी ह्या संकल्पनेबाबत जाणून घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथपाल श्री शेळके यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे विविध विषयांतील वरिष्ठ प्राध्यापक, अध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.