आज दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नंदुरबार येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये एकूण 48 ब्लड बॅग संकलित करण्यात आल्या. शिबिराचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार चे अधिष्ठाता डॉ अरुण हुमणे यांनी केले. सदर शिबिराचे आयोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथील रक्तपेढी मार्फत करण्यात आले होते.