Event Detail
जागतिक एडस् दिनाच्या निमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार, जिल्हा सामान्य रुग्णालय नंदुरबार, नंदुरबार जिल्ह्यातील विविध नर्सिंग तसेच ईतर महाविद्यालयांचे विद्यार्थी, तसेच एडस् जनजागृती मध्ये कार्यरत विविध संस्था यांचे संयुक्त विद्यमाने जनजागृतीसाठी भव्य रॅली चे आयोजन DAPCU मार्फत करण्यात आले

आज दिनांक 1 डिसेंबर २०२३ रोजी जागतिक एडस् दिनाच्या निमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार, जिल्हा सामान्य रुग्णालय नंदुरबार, नंदुरबार जिल्ह्यातील विविध नर्सिंग तसेच ईतर महाविद्यालयांचे विद्यार्थी, तसेच एडस् जनजागृती मध्ये कार्यरत विविध संस्था यांचे संयुक्त विद्यमाने जनजागृतीसाठी भव्य रॅली चे आयोजन DAPCU मार्फत करण्यात आले होते. त्यात विविध महाविद्यालय, विद्यालये यांचे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सदर रॅली नंदुरबार शहरात काढण्यात आली. रॅली ची सुरुवात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार चे अधिष्ठाता डॉ अरुण हुमणे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नरेश पाडवी यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथील डॉ अमोल किनगे, डॉ सतिश वड्डे, डॉ संतोष पवार, डॉ सुधाकर बंटेवाड, करण जैन आणि विविध विभागांचे अध्यापक व कर्मचारी सदर रॅली साठी उपस्थित होते. रॅली ला अधिष्ठाता डॉ अरुण हुमणे यांनी "सामाजिक पुढाकार - एडस् चा संहार" या थीम वर संबोधित केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.