शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार तर्फे मनुदेवी फाउंडेशन नंदुरबार संचालित मूकबधिर विद्यालय नंदुरबार येथे स्वस्थ मुख अभियान राबविण्यात आले. त्या प्रसंगी दंतशल्यचिकित्सा विभागाच्या डॉ भावना वळवी आणि चमू द्वारे मूकबधिर विद्यार्थ्यांचे दातांची तपासणी करण्यात आली आणि स्वच्छ मुख ठेवण्याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन आणि मूकबधिर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार डॉ अरुण हुमणे सर यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक, अध्यापक आणि कर्मचारी यांचे सहकार्याने सदर तपासणी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.