Event Detail
04 Aug 2023
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार तर्फे राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त 3 ऑगस्ट रोजी जिजामाता महाविद्यालय नंदुरबार येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार तर्फे राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त 3 ऑगस्ट रोजी जिजामाता महाविद्यालय नंदुरबार येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वैद्यकीय महाविद्यालाचे अधिष्ठाता डॉ अरुण हुमणे यांनी केले, तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांनी ह्या संकल्पनेबाबत जाणून घेण्याचे आवाहन केले. डॉ अमोल किनगे, सहायक प्राध्यापक, जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग यांनी जनजागृतीसाठी प्रेझेंटेशन सादर केले. कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन श्री करण जैन यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, अध्यापक तसेच एनएसएस विभागाचे सहकार्य लाभले.